श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…
श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात रमली होती. याचवेळी फोटोग्राफर्सनी श्रद्धाला घेरलं आणि तिचे फोटो क्लिक करू लागले.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरही श्रद्धा अनेकदा चर्चेत असते. नुकतच श्रद्धाला एका शूटिंग लोकेशनला स्पॉट करण्यात आलंय. मात्र यावेळी फोटोग्राफर्सनी असं काही केलंय की कदाचित हे कृत्य श्रद्धाला आवडणार नाही. सेटवर एका खास व्यक्तीशी चॅट करत असताना श्रद्धाला स्पॉट करण्यात आलं यावेळी श्रद्धाचं चॅट कॅमेरात कैद झालंय.
सेटवर श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये रमली होती. श्रद्धाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये श्रद्धा खूपचं सुंदर दिसत होती. यावेळी श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात रमली होती. याचवेळी फोटोग्राफर्सनी श्रद्धाला घेरलं आणि तिचे फोटो क्लिक करू लागले.मात्र काही कॅमेरांमध्ये श्रद्धाचं चॅट देखील कैद झालंय. आता या चॅटचे फोटो लीक झाले असून ते चाांगलेच व्हायरल होवू लागले आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात श्रद्धा कपूरचं चॅटही दिसून येतंय.
श्रद्धा एका खास व्यक्तीशी चॅट करत असल्याचं दिसून येतंय. श्रद्धा ज्या व्यक्तीसोबत चॅट करत आहे. ज्या व्यक्तीचा नंबर तिने कोणत्याही नावाने नव्हे तर तीन हार्टचे इमोजी ठेवून सेव्ह केलाय. यात श्रद्धाने लिहिलीय. “मी आयुष्यात कधी तुझ्या सारख्या व्यक्तीला भेटले नाही.” यावर उत्तरात समोरच्या व्यक्तीने लिहिलं “मला आनंद आहे की तू असा विचार करतेस.”
या पुढे श्रद्धाने चॅटमध्ये लिहिलंय, “तू खरचं ऐकतोस, असं कुणी आता राहिलं नाही. तुझ्या मुळे मला कायम स्पेशल फील होतं. ” यावर तिला एक हार्टचं इमोजी दिलं आहे. “माझी सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी थँक्यू” असं पुढे तिने टाइप केलंय. यात त्या खास व्यक्तीने उत्तर देत म्हंटलं, “हे माझं नशीब आहे. जेव्हा काही गरज असेल मला सांग.” श्रद्धाचं हे चॅट सध्या चांगलचं व्हायरल झालंय.