युवा कार्यकर्ते साजिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावरकर गुरुकुल संस्थेला धान्य वाटप
तळेगाव दाभाडे : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल येथे गरीब कुटुंबातील मुले शिक्षणासाठी राहत असून, मावळ तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्था चालत आहे.
गुरुवार (दि .25) वाढदिवसानिमित्ताने स्वा. वि. दा . सावरकर गुरुकुल येथे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन महिन्याचा किराणा संस्थेला देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने, नगरसेविका प्राची हेंद्रे, नगरसेवक अरुण भेगडे, प्रदीप हुलावळे, मुन्ना मोरे, नितीन पोटे, विनोद तथा बंटी भेगडे, अमोल केदारी, आशुतोष हेंद्रे, प्रदीप टेकवडे, जालिंदर भेगडे, सतीश राऊत, सुभाष जाधव, सागर शिंदे, उपेंद्र खोल्लम, जमीर नालबंद, सोहेल शिकीलकर, मन्सूर शाह, जावेद शेख, अय्याज नालबंद, विशाल भेगडे, विकास घारे, करण गोणते, गुरुकुल संस्थेचे सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते.