महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आपले ध्येय निश्चित करावे – प्रा. संपत गारगोटे
राजगुरूनगर । सह्याद्री लाइव्ह । आजच्या तरुणांना एखाद्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती पाहिली की त्यासारखे आपणही असावे असे वाटतं, नंतर दुसरी एखादी व्यक्ती पाहिल्यावर त्यासारखे आपण असावे असे वाटते; पण स्वतःचे ध्येय काही निश्चित होत नाही. तरुणांना स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय निश्चित करावे आणि धेय्य निश्चित झाल्यावर आपल्या धेय्यावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय राजगुरूनगर, राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत व तिन्हेवाडी (ता. खेड) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत, ‘युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास’ या संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘२१ व्या शतकातील तरुण’ या विषयावर प्रा. संपत गारगोटे बोलत होते.
शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे म्हणाले की, २१ व्या शतकात जगभरात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. आजच्या तरुणांना एखाद्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती पाहिली की त्यासारखे आपणही असावे असे वाटतं, नंतर दुसरी एखादी व्यक्ती पाहिल्यावर त्यासारखे आपण असावे असे वाटते; पण स्वतःचे ध्येय काही निश्चित होत नाही. तरुणांना स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय निश्चित करावे आणि धेय्य निश्चित झाल्यावर आपल्या धेय्यावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन गारगोटे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर जगदाळे, सरपंच अरुण थिगळे, बिजली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आरुडे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, ज्येष्ठ प्रा. साईनाथ पाचारणे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिल्पा जगताप, कला विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश भोकसे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अभिजित बेंडाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. तुषार वेहळे, प्रा. आरती इंदाईस, प्रा. के. ए. बेंडाले, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. ललिता काठे, प्रा. जे. ची. शेलार, लहू रौंधळ, योगेश आदक, चेतन साळवे, अरुण तांबे, निवेदक उत्तम राक्षे, युवा नेते शुभम सांडभोर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल शिंदे हिने केले. सूत्रसंचालन प्रवीण कोबल याने केले. साहिल गोरडे याने आभार मानले.