सलमान खानला वाय प्लस सुरक्षा
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिस प्रशासनाकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये यांसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यात सलमानला यापुढील काळात वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सिद्धु मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोईकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावानं आले होते. यानंतर सलमाननं त्याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
लॉरेन्स बिष्णोईकडून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचा सलमानच्या घरी पहारा सुरु आहे.