‘आदीपुरूष’ फ्लॉप होणार?
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । नुकताच बाहूबली फेम प्रभासचा ‘आदीपुरूष’ या सिनेमाचा टिझर रिलिज झाला. ‘रामायण’ या हिंदू महाकाव्यावर आधारित हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ ला रिलिज होणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरूष या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणुनही हा चित्रपट चर्चेत आहे.
या चित्रपटामध्ये प्रभु रामांच्या मुख्य भुमिकेत प्रभास तर अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सितेच्या भुमिकेत दिसणार असून रावणाची भुमिका सैफ अलि खान याने साकारली आहे. तसेच देवदत्त नागे, हनुमान तर सन्नी सिंह गुज्जर, लक्ष्मण अशी या सिनेमाची काही महत्वाची पात्र आहेत.
या चित्रपटाचा टिझर चांगलाच वादाच्या भोव-यात सापडला आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सैफ अलि खान ने साकारलेली रावणाची भुमिका. या चित्रपटात रावणाचा लुक हा लंकापती रावणाचा अपमान करणारा आहे असे मत अनेकांनी दिले असुन वेगवेगळ्या प्रकारे ह्या लुक ला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. ‘हा नक्की रावण आहे कि खिल्जी’ अशाप्रकारचे प्रश्न विचारत लोक या लुकला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाच्या जवळजवळ सर्वच पात्रांना सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.
पात्रांबरोबरंच चित्रपटाच्या VFX चीही खिल्ली उडवली जात आहे. रामायण हे हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान असल्यामुळे हा सिनेमा धार्मिक वादात अडकून फ्लॉप होतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.