भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचाच फोटो का?
सह्याद्री लाइव्ह। पुर्वीच्याकाळी वस्तु विनिमय पद्धत होती. परंतु त्यामुळे वस्तूचे मुल्य ठरवणे अवघड जात असे म्हणून पैंसा ही संकल्पना उदयास आली प्रत्येक देशाचे चलन हे भिन्न स्वरुपाचे असते तसेच भारताचे चलन ‘रूपया्’ हे आहे. पण हा ‘रूपया’ म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तरे आपण जाणुन घेणार आहोत.
रूपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य रुप्याचे नाणे किंवा रौप्य ह्या शब्दापासुन आलेला आहे. रुपे हा चांदी-रजक या दोन धातुंचा संमिश्र धातु आहे. पुर्वीच्याकाळी राजे चांदीपासुन नाणे निर्मिती करत म्हणुन भारत सरकारने चांदी पासुन नाणे निर्मितीचा निर्णय घेतला परंतु हा धातु किंमतीच्या तुलनेने मौल्यवान आहे असे जाणवले म्हणून त्यात रजक धातु मिसळुन रूपया् बनवण्यात आला.
सर्व नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो का?
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळाले परंतु संपुर्ण देशात प्रजासत्ताक दिनी भारतीय चलन ‘रूपया्’ वापरात आले. सर्वप्रथम एक रुपया चलनावर अशोकस्तंभाचे चित्र असायचे. १९५० मध्ये २,५,१० आणि १००रु चलनी नोटा प्रथमत: वापरात आल्या. प्रत्येक नोटेच्या डिझाइन मध्ये फ़ारसा फ़रक नव्हता फ़क्त रंग वेगवेगळे होते १९५३ मध्ये नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली १९५४ मध्ये १हजार,१० हजार च्या नोटा छापण्यात आल्या व पुन्हा १९७८ मध्ये ह्या नोटा चलनातुन बाद करण्यात आल्या.
महात्मा गांधी यांच्या १०० व्या जयंती निमित्त १९६९ मध्ये पहिल्यांदा गांधीजींचा फोटो चलनी नोटांवर छापण्यात आला. पुढे देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत गेली, म्हणून रिझर्व्ह बँकेने १९८७ मध्ये पहिल्यांदा ५००रु नोटा चलनात आणल्या. त्यावरही महात्मा गांधीजींचे छायाचित्र व अशोकस्तंभाचे watermark होते. सुरक्षिततेसाठी आणि अंध लोकांसाठी १९९६ मध्ये ह्या नोटांमध्ये नवीन features आणि महात्मा गांधी series सामील करण्यात आले. ९ आक्टोंबर २००० मध्ये १हजार रूपयांची नोट चलनात आणण्यात आली. पुढे ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० आणि १००० रु सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या व नंतर नवीन ५००रू आणि २०००रु नवीन नोटा चलनात आणल्या.