“आम्ही राजगुरूनगरकर’धावले मदतीला
दोंदेतील दिव्यांग महिलेची कुंचबणा थांबवली
राजगुरूनगर प्रतिनिधी) : दोंदे (ता. खेड) गावामधील सैंदाणे ठाकरवाडी येथील आदिवासी दिव्यांग महिला गिरीजाबाई रंगनाथ जाधव यांना लोकसहभागातून आम्ही राजगुरूनगरकर ग्रुप आणि दोंदेतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 50 हजार रुपयांचे कमोड पद्धतीच्या शौचालयाची उभारणी करून जाधव यांची कुंचबणा थांबवली आहे.
शौचालय बांधण्यासाठी उद्योजक सुजित काळे, ऍड. सुमित नाईकरे, सरपंच दत्ता पडवळ, सामाजिक कार्यकर्ते अमर टाटीया, माजी नगरसेवक राहुल आढारी, अनिल बारणे, संग्राम सातकर, राजु कोहिनकर, नरेश हेडा, हार्दीप पटेल, शशिकांत सांडभोर, सुरेश दरवडे, जितेंद्र काळे, सुहास बनकर, सुरज बनकर, विठ्ठल सुकाळे तसेच दोंदे येथील ग्रामस्थांनी मदत केली.
जाधव कुटुंबास शौचालय प्रदान करतेवेळी आम्ही राजगुरूनगरकर ग्रुपचे सदस्य नितीन सैद, मच्छिंद्र पवळे, दत्ता रुके, प्रवीण गायकवाड, नितिन वरकड, हर्षद टाकळकर, कैलास दुधाळे, अमर टाटीया, दोंदचे सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, सदस्या नंदा जाधव, किरण तनपुरे, केशव अरगडे, ग्रामसेवक निलेश पांडे आदी उपस्थित होते.
दोंदे (ता. खेड) : येथील सैंदाणे ठाकरवाडी मधील दिव्यांग गरीब महिलेला आम्ही राजगुरुनगरकर गृपच्या वतीने शौचालय बांधून देण्यात आले.