राजगुरुनगर नगरपरिषदेची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
वेताळे । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वेताळे येथे साकुर्डी रस्त्यावर फुटली. पाईपलाईन फुटल्याचे समजताच विद्युत पंप्प बंद करण्यात आला पण पाईपलाईन मोकळी होण्यासाठी चार ते पाच तासांचा अवधी लागला. या दरम्यान लाखो लिटर पाणी गटारातन वाहून गेले.
राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी या भागात वारंवार फुटत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन महिन्यात ही जलवाहिनी फुटण्याची तीसरी घटना आहे.
खेड तालुक्यातील गावांबरोबरच शहरांची पाण्याची तहान भागवण्याचे काम चासकमान धरण करते. तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहराला चासकमान धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. वेताळे येथील समजाईमाता डोंगरावरील पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून शहराला पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे राजगुरुनगरवासीयांना अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर बातम्या पाहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES