साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी जिंकली तिन्हेवाडी ग्रामस्थांची मने !
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची उत्साहात सांगता
खेड । सह्याद्री लाइव्ह । राजगुरूनगर येथील साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर तिन्हेवाडी (ता. खेड) येथे दि. २२ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान उत्साहात संपन्न झाले. ‘युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास’ अशी संकल्पना असलेल्या शिबिरात सुमारे ५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
शिबिराच्या उद्घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, विजय वाडेकर, सुरेश टाकळकर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, लोकनियुक्त सरपंच अरुण थिगळे, राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी पाचारणे, उपसरपंच संतोषी ढोरे, भांबुरवाडीच्या सरपंच कुसूम भांबुरे, अरविंद दौंडकर, माजी सरपंच कविता पाचारणे, उदय बाप्पू पाचारणे, उद्योजक राजेंद्र पाचारणे, संतोष पाचारणे, रामदास सांडभोर, पोलीस पाटील महेश सांडभोर, प्रा. बी. बी. आरुडे, रामदास पाचारणे, अरुण सांडभोर, ग्रामपंचायत सदस्या सीमा आरुडे, मोहन पाचारणे, विकास आरुडे, त्रिमूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम दिघे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटोळे, मुख्याध्यापक जे. बी. फदाले, ग्रामसेवक किशोर रायसिंगवाकडे आदी उपस्थित होते.
शिबिर काळात स्वयंसेवकांनी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, लिंगभाव संवेदनशीलता जनजागृती, लोकशाहीतील सहभाग व जनजागृती, जलस्रोत व वृक्षरोपण, प्रधानमंत्री जनधन व विमा योजना, अन्न सुरक्षा जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा स्रोत, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्री-भ्रूणहत्या, ग्रामीण विकासात ग्रामसभेची भूमिका, आर्थिक स्वावलंबन, रस्ते सुरक्षा अभियान राबवत ग्रामस्थांचे प्रबोधन केले, टेंभीच्या डोंगरावरील दोन हजार वृक्षांची आळी करून वृक्षांना माती व खत टाकण्यात आले. समारोपाच्या दिवशी आरोग्य शिबीर घेण्यात आले. अशा प्रकारे विविध उपक्रम शिबीर कालावधीत राबवत साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी तिन्हेवाडी ग्रामस्थांची मने जिंकली.
शिबिरातील स्वयंसेवकांना गटविकास अधिकारी अजय जोशी, नामदेव सांडभोर, शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे, डॉ. स्नेहा भोंडवे, कैलास मुसळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, साहित्यिक साईनाथ पाचारणे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराचा समारोप संस्थेचे संचालक हिरामण सातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी संचालक राजेंद्र टाकळकर, रासेयो पुणे जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर उपस्थित होते. या शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून साहिल गोरडे आणि सिद्धीका चोरघे यांना गौरविण्यात आले.
शिबिराचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, यांच्यासह वरिष्ठ प्राध्यापक साईनाथ पाचारणे, प्रा. डॉ. शिल्पा जगताप, डॉ. उमेश भोकसे, अभिजित बेंडाले, तुषार वेहळे, सहकार्यक्रम अधिकारी श्वेताली देशमुख, मोनिका कोल्हे, रुपाली कातोरे, आरती इंदायीस, सोनाक्षी बेल्हेकर, काजल गोकुळे, धनवर्षा बोऱ्हाडे, शशिकांत बुरुड, शिवम कदम, प्राजक्ता गदाडे, ललिता काठे, जे. सी. शेलार, रोहिणी मेचकर, ए. एच. इनामदार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.