शिंदे गावच्या ग्रामस्थांना पंधरा वर्षानंतर मिळाला न्याय; डाऊ कंपनी आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता
आंदोलक, वारकरी गावक-यांमध्ये आनंदाचे वातावरण
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील शिंदे गावात केमिकल फॅक्टरी येऊ नये यासाठी गावातील वारकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. 2008 साली या आंदोलनाला उग्र स्वरूप मिळाले आणि त्याचं रूपांतर जाळपोळ आणि तोडफोडीत झाले. कंपनीला सरकारकडून स्थगिती देण्यात आली आणि गावक-यांचा लढा यशस्वी ठरला. पण या आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीबद्दल ग्रामस्थांवर कंपनीने गुन्हे दाखल केले. तत्कालिन सरकारप्रमाणेच त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने हे खटले मागे घेण्याचा दावा केला परंतू ते शक्य झाले नाही. या आंदोलकांवर सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्याचा निकाल नुकताच जाहिर झाला. या प्रकरणातील सगळ्या आंदोलकांची पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. निकालानंतर आंदोलकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES