जिल्हा बॅंकेसाठी दिग्गज्ज रिंगणात
बारामतीतून संजय देवकाते यांचा अर्ज दाखल
बारामती – पुणे जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बॅंकेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. या निवडणूकीसाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. या दिग्गज्जांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे या बॅंकेची निवडणूक राज्यात चर्चेली जात आहे. व अनेक दिग्गजनेते बॅंकेवर जाण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
बारामती येथून सोमवारी (दि. 6) संजय ज्ञानदेव देवकाते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देवकाते हे निरावगाजचे रहिवासी असून, निरावागज ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तर सदस्य म्हणून 10 वर्षे कामकाज केलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम केले आहे. जिल्हा पातळीवर संपर्क साधुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तळागळापर्यंत काम केले आहे सध्या ते बारामती दूध संघाचे संचालक म्हणून काम करीत आहेत.