सरेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम
सरेवाडी । सह्याद्री लाइव्ह । भीमाशंकरच्या पायथ्याशी, आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा सरेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून निबंध लेखन, रंगभरण स्पर्धा, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिकरीत्या वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही द्वारे ऑनलाइन यू-ट्यूब माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहितीपट दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. रोहित ठोकळ यांनी केले. नव्याने वकीली क्षेत्रात प्रवेश करणार्या कायद्याचे ज्ञान असणाऱ्या ॲड. ठोकळ यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विवेचन करण्यात आला. संविधानातील कलमे, संविधानाच्या प्रस्ताविकेचा अर्थ समजून सांगितला.
कार्यक्रम प्रसंगी नायफड गावचे पोलीस पाटील विनायकजी ठोकळ, अंगणवाडीताई सुलाबाई ठोकळ, निलेश शेठ ठोकळ, शिवाजीराव ठोकळ, दिलीपराव ठोकळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शंकर ठोकळ, गटशिक्षणाधिकारी जीवनजी कोकणे, केंद्राचे केंद्रप्रमुख भरतराव लोखंडे, मुख्याध्यापक बापूराव दराडे व कार्यक्रमाचे नियोजन विजयकुमार शेटे यांनी केले.