लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या वतीने विविध उपक्रम
राजगुरुनगर| सह्याद्री लाइव्ह। खेड तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या स्वमालकीच्या क्लब हाऊसचे उदघाटन जिल्हा प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते येथे बुधवारी (दि. २४) संपन्न झाले.
संजय वाडेकर व कुटुंबीयाच्या वतीने चाकण सफायर लायन्स क्लबला सुमारे २१ लाख किमतीचा ५५० वर्गफूट आकाराचा फ्लॅट क्लब हाऊसच्या माध्यमातून सप्रेम भेट दिला. यावेळी संजय वाडेकर यांना डिस्ट्रिक्ट अँप्रिसिएशन सर्टिफिकेट व पिन देऊन सन्मानित करण्यातआले.
यावेळी बोलताना कोठवदे यांनी क्लबचे कौतुक करून या ठिकाणी लवकरच एलसीआयएफच्या माध्यामातून समाजपयोगी पर्मनंट प्रोजेक्ट आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी झोन चेअरमन गणेश शेटे, क्लबच्या अध्यक्षा शितल गावडे, सचिव अरुणा बोंडे, खजिनदार वैशाली परदेशी यांच्यासह अविनाश करपे, विष्णू कड, दत्तात्रय गोरे, गुलाब डोखे, अमृत गोरे, नितीन मुंगसे, काजल डोखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सोनावळे यांनी केले तर आभार राजू गायकवाड यांनी मानले. दुसऱ्या एका उपक्रमात लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वसुंधरा संवर्धन अंतर्गत चाकण नगरपरिषद यांचे स्वच्छ चाकण व सुंदर चाकण या उपक्रमाअंतर्गत लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर यांच्या वतीने प्लास्टिक बंदीला अनुसरून प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्याचे मोफत वाटप या उपक्रमाचा उदघाटन समारंभ चाकण नगरपरिषदेच्या शिवछत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
लायन्स क्लबचे हे कार्य समाजाप्रती असणारी बांधिलकी जपणारे असून या कापडी पिशव्या मोफत वाटप कार्यक्रमाने नगरपरिषदेला लायन्स क्लब चाकण सफायर यांची समर्थ साथ लाभणार आहे. त्यामुळे लायन्स क्लब चाकण सफायर यांचे हार्दिक आभार असे गौरवोद्गार चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी काढले.
याप्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल ला राजेश कोठावदे, झोन चेअरमन ला गणेश शेटे, क्लबच्या अध्यक्षा ला शीतल गावडे, सचिव ला अरुणा बोन्डे खजिनदार ला वैशाली परदेशी, ला संतोष सोनावळे, माजी नगराध्यक्षा स्नेहा जगताप, नगरसेविका सुजाता मंडलिक व हुमा शेख, नगरसेवक ला सागर बनकर, ला दत्तात्रय गोरे, ला संजय वाडेकर, ला राजू गायकवाड, ला अमृत गोरे, ला नितीन वाव्हळ यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लबच्या वतीने एक हजार कापडी पिशव्या मोफत वाटण्यासाठी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला नितीन वाव्हळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ला विष्णू कड यांनी केले.