चास-कमान सोसायटीच्या अध्यक्षपदी वैभव राक्षे यांची बिनविरोध निवड
चास । सह्याद्री लाइव्ह । चास-कमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वैभव हरिश्चंद्र राक्षे यांची बिनविरोध निवड झाली.
चास सोसायटीची निवडणूक मागील वर्षी अतिशय अटीतटीची झाली. या लढतीत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट व जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
दहा विरुद्ध तीन, अशा मोठ्या फरकाने जय सोमेश्र्वर शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे सर्वांना पदाची संधी मिळावी, यासाठी मागील वर्षी अध्यक्षपदी निवड झालेल्या शैला घनवट नुकताच राजीनामा दिला होता.
त्यामुळे रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी वैभव राक्षे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांनी त्यांना विजयी घोषित केले. यावेळी सदस्य शैला घनवट, राजेंद्र गायकवाड, अनिल घनवट, अरुण बुट्टे, अशोक मुळूक, संगीता चव्हाण, सुनील निर्मळ, बापू गोसावी उपस्थित होते.
तसेच, काही दिवसांपूर्वी उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपाध्यक्षपदी मच्छिंद्र तुकाराम मुळूक यांची बिनविरोध निवड झाली होती.
संजय घनवट यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब बुटे, संदीप ढमढेरे, संदेश मुळूक, चांगदेव राक्षे, राजेंद्र घाटकर, उपसरपंच जावेद इनामदार, सागर मुळूक, प्रमोद मुळूक, सुधाकर राक्षे, विनोद बोऱ्हाडे, विजय वाघुले आदी उपस्थित होते.
1 Comment
NICE