‘जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’
by
sahyadrilive
February 22, 2023 11:52 AM
कल्याण । सह्याद्री लाइव्ह । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सत्ता आणि त्यानंतर पक्षाचे नाव चिन्ह असं बरंच काही गमवावे लागले. निवडणूक आायोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत. शिवसेना कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी तर जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली आहे.
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या समोर ‘आज महाराष्ट्रावर संकट आलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही…’ अशी शपथ रसाळ यांनी घेतली आहे.