अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची दुहेरी हत्याकांडातून निर्दोश मुक्तता
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । मुंबईतल्या दुहेरी हत्याकांडातून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोश मुक्तता करण्यात आली आहे. त्याच्यासह मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उम्मेद या तिघांचीही गुन्हा सिद्ध न झाल्यामूळे सूटका झाली आहे.
मुंबईतल्या जेजे सिग्नलजवळ छोटा शकील टोळीतल्या आसिफ दधी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक यांची २९ जुलै २००९ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या सगळ्या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचा आरोप छोटा राजनवर केला गेला होता परंतू छोटा राजनसह या तिघांचाही गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी यंत्रणेला यश आलं नाही. कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. शिवाय ओळख परेडमध्येही यश आलं नाही, त्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि शस्त्रही जुळत नसल्याने या आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज हा निकाल दिला.