पुण्यात सेक्सटॉर्शनचे दोन बळी; एकाला अटक
पुणे । सह्याद्री लाइव्ह । ऑनलाईन माध्यमाद्वारे ओळख झालेल्या तरुणीची नग्नावस्थेतील छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याच्या घटनेतून पुण्यात तरुणांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना काही दिवसापुर्वी समोर आल्या होत्या. तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात एका तरुणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली असून त्यामागचे धक्कादायक वास्तव पुणे सायबर पोलिसांनी समोर आणले आहे.यावर्षी सेक्सटॉर्शनच्या पुण्यात तब्बल १४०० तक्रारी दाखल असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
या घटनेसंदर्भात एकाला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी तपसादरम्यान अटक करण्यात आलेल्या या आरोपीने चौकशीदरम्यान राजस्थानमधील गुरुकोठडी हे संपूर्ण गांव सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं सांगितले आहे.