पुणे जिल्ह्यात अडीच लाख नवमतदार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नाव नोंदणी मोहीम
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नाव नोंदणी मोहीमेत तब्बल 2 लाख 62 हजार 645 मतदारांची संख्या नव्याने वाढ झाली. यामुळेच आता पुणे जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 81 लाख 58 हजार 539 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने रविवारी अद्यावत मतदारांची यादी जाहीर केली.
पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार संख्या ठरलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 5 लाख 64 हजार मतदार आहेत. मतदार नोंदणी विशेष मोहीमेत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 72 हजार लोकांनी अर्ज केले आहेत, तर मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी 33 हजार 72 अर्ज आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात नव्याने तब्बल 3 लाख 96 हजार मतदारांनी नाव नोंदणी केली. या सर्व अर्जाची छाननी करून यामध्ये जिल्ह्यात नव्याने तब्बल 2 लाख 62 हजार 645 मतदारांची यादी झाली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या
जुन्नर – 3 लाख 09 हजार 204, आंबेगाव – 2 लाख 97 हजार 158, खेड-आळंदी – 3 लाख 45 हजार 437, शिरूर – 4 लाख 13 हजार 250, दौंड – 3 लाख 08 हजार 678, इंदापूर – 3 लाख 13 हजार 694, बारामती – 3 लाख 54 हजार 095, पुरंदर – 4 लाख 07 हजार 009, भोर – 3 लाख 88 हजार 401, मावळ – 3 लाख 66 हजार 909, चिंचवड – 5 लाख 64 हजार 967, पिंपरी – 3 लाख 68 हजार 789, भोसरी – 4 लाख 98 हजार 090, वडगावशेरी – 4 लाख 71 हजार 010, शिवाजीनगर – 2 लाख 90 हजार 919, कोथरूड – 4 लाख 34 हजार 575, खडकवासला – 5 लाख 40 हजार 572, पर्वती – 3 लाख 56 हजार 212, हडपसर – 5 लाख 55 हजार 910, पुणे कॅन्टोन्मेंट – 2 लाख 87 हजार 535, कसबा – 2 लाख 86 हजार 057.