Twitter चे संचालक मंडळ बरखास्त
इलॉन मस्क बनणार नवे CEO
सॅन फ्रान्सिस्को । सह्याद्री लाइव्ह । Twitter चे नवे मालक इलॉन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर, आता Twitter चं संचालक मंडळ बरखास्त केलं. Twitter च्या सर्व संचालकांना हटवून त्यांनी कंपनीची कमान हाती घेतलीय.
यासह मस्क यांनी जाहीर केलं की, ते लवकरच Twitter च्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारतील. यामुळं इलाॅन मस्क आगामी काळात अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात.
Twitter डील पूर्ण झाल्यानंतर, इलॉन मस्क Twitter चे नवे बॉस बनलेत. त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. आता मस्क यांनी Twitter चं संचालक मंडळही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळातून ब्रेट टेलर, ओमिड कोर्डेस्तानी, डेव्हिड रोसेनब्लाट, मार्था लेन फॉक्स, पॅट्रिक पिशेट, एगॉन डर्बन, फी-फेई ली आणि मिमी अलेमायेहौ यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे.