टॉलिवूड एक दिवसासाठी बंद
by
sahyadrilive
November 16, 2022 1:46 PM
हैदराबाद । सह्याद्री लाइव्ह । प्रसिद्ध तेलुगु अभिनेते महेश बाबू याचे वडील कृष्णा घट्टामनेनी याचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना हैदराबाद येथील कॉन्टिनेंटल हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याच्या जाण्यानं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
या संदर्भात द तेलुगू फिल्म प्रॉडयुसर कौन्सिल ने “बुधवारी चित्रपटाशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द केले जातील”असे जाहीर केले आहे. निवेदन शेअर करताना, “सुपरस्टार कृष्णागरु sir यांच्या सन्मानार्थ तेलुगु चित्रपट उद्योग उद्या (बुधवार)बंद राहील”असे पीआरओ वामसी शेखर यांनी ट्विट केले आहे.