भारताचे दुग्धपुरूष डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त अमूल क्लिन फ्युएल कार रॅलीचे आयोजन
भारताच्या मिल्कमॅनला अनोखी मानवंदना
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । तब्बल अठरा वर्षांनंतर होलेवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी मेहनतीला फळ मिळाले. गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी मार्गदर्शक शिक्षिका आणि यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांचा सन्मान केला. मार्गदर्शक शिक्षिकेस एक सुवर्णमुद्रा आणि घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी (दि. १५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होलेवाडी येथे ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले यांनी भूषविले. यावेळी शिवाजी होले आणि माजी सैनिक शांताराम होले यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजवंदना देण्यात आली.
महाराष्ट्र शिक्षण परिषदेने घेतलेल्या (सन २०२३) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) होलेवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले. तर सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
वैष्णवी मांजरे हिने राज्यात सहावा, तर ज्ञानेश्वरी पानमंद या विद्यार्थिनीने राज्यात दहावा क्रमांक पटकावला. याशिवाय अविष्कार जाधव, श्रावणी होले, वैभवी मांजरे, संस्कृती होले, आराध्या मांजरे, सिद्धार्थ मांजरे, वैष्णवी होले हे सात विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले.
या यशवंत नऊ विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्यावतीने सायकल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका पुष्पांजली राळे यांना सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याशिवाय शिक्षिका राळे यांचा शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांकडून सत्कार करण्यात आला.
पहा होलेवाडी शाळेतील शिक्षिका पुष्पांजली राळे यांचे भाषण
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या मनस्वी टाव्हरे, राजनंदनी होले, प्रणवी मांजरे, अविष्कार जाधव, राजवीर टाव्हरे, संस्कृती होले, तन्वी काळे, कार्तिकी होले, समृद्धी जायभाय, गणेश जायभाय, साई पवळे या ११ विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट वॉच’, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देत कौतुक करण्यात आले.
यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, माजी सरपंच मोनिका होले, पोलीस पाटील संतोष होले, माजी उपसरपंच रोहिदास होले, सोनम होले, नितीन होले, माजी सरपंच नारायण धोंडिबा होले, माजी चेअरमन वसंत होले, दिनकर होले, सुभाष काळूराम होले, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबन होले, निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय होले, श्रीकांत होले, अभिजित होले, महापारेषणचे उपव्यवस्थापक विश्वास होले, प्रशांत होले, ग्रामपंचायतीचे प्रशासक पांडुरंग घोगरे, ग्रामसेविका तृप्ती झरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले, उपाध्यक्ष प्रवीण होले, सदस्य गणेश होले, तुषार टाव्हरे, शिवाजी हरिभाऊ होले, साधना होले, ज्ञानेशा होले, चंद्रकांत होले, रेश्मा हुंडारे, उज्वला वाळूंज यांच्यासह निलेश होले, एलआयसी एजंट संतोष होले, मुख्यध्यापिका रोहिणी लांघी, संगीता दिघे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कडलग यांनी केले. प्रास्ताविक नूतन कडलग यांनी केले. मंजूषा गाढवे यांनी आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES