तिन्हेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटोळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
तिन्हेवाडी । सह्याद्री लाइव्ह । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी (न.१) च्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटोळे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पुणे-नाशिक महामार्गावरील रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालय चांडोली येथे पार पडला.
या प्रसंगी तिन्हेवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अरुण थिगळे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, वडगाव पाटोळे गावचे माजी सरपंच कैलास गायकवाड, रंगनाथ आरूडे, पांडुरंग आरूडे, नाना आरुडे, शिवाजी आरूडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास आरुडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आरती टेंभुरकर, खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पना टाकळकर या होत्या.
मुख्याध्यापिका सुनंदा पाटोळे आपल्या ३७वर्षांच्या सेवेचा जीवनपट उलगडताना काही प्रसंगी भावूक झाल्या होत्या. तुकाईनगर भांबुरवाडी केंद्राच्या शिक्षकांच्या वतीने उभयतांना संपूर्ण पोशाख व सुवर्ण मुद्रिका देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय तिटकारे, बाळासाहेब बारवेकर, नारायण बनकर, अजय पाटील, हरीश हजारे, हनुमंत लोंढे, चंद्रकांत डफळ, लता तळपे, मनीषा कांबळे, पद्मा शिंदे, नंदा जंगले, संध्या तेंडोलकर, अनिता केदारी, शिल्पा कोरडे, हेमा घोलप, चंद्रकांत ढवळे, यांनी केले. रेखा लांडे व अलका डफळ यांनी मनोगते व्यक्त केली. सुंदर असे ईशस्तवन व स्वागतगीत तुकईभांबुरवाडीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.
प्रस्ताविक सुरेश आदक सूत्रसंचालन आत्माराम शिंदे यांनी केले तर आभार विजयकुमार शेटे यांनी मानले. कार्यक्रमाची इतर सर्व व्यवस्था केंद्रातील रोहिणी बनकर, सुजाता बोराडे, सुरेखा पालवे, विद्या भापकर, निलम आढारी, निलिमा गोपाळे, सुनंदा शेळके, सविता धाडगे यांनी पार पाडली.
“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी!”
– सुनंदा पाटोळे
माजी मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिन्हेवाडी.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES