बिरदवडी रस्त्यालगतच्या साईटवरून बांधकाम साहित्याची चोरी
by
sahyadrilive
January 27, 2023 4:05 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह । बिरदवडी रस्त्यावरील मार्तंड पार्क प्लॉटिंगमधील ७६ हजार रुपयांचे बांधकाम साहित्याची चोरट्यांनी लांबविले. गुरुवारी (दि. २६) सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी विकी सुरेश थोरात (वय २७, रा. लौकी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात विकी थोरात यांचा मार्तंड पार्क नावाने प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. २५ जानेवारीच्या रात्री दहा वाजता ते २६ जानेवारी रोजी सकाळी सातच्या दरम्यान चोरट्याने प्लॉटिंगच्या ठिकाणाहून बांधकाम साहित्याची चोरी केली. चोरट्यांनी लाकडील प्लाय आणि लोखंडी सेंट्रिंग प्लेटा असा ७६ हजार रुपयांचे साहित्यावर डल्ला मारला.
या प्रकरणी चाकण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.