इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी; चाकणमधील प्रकार
by
sahyadrilive
February 20, 2023 5:11 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकण परिसरातील भुजबळ अळीमधून एक दुचाकी चोरी झाली आहे. साई प्रेस्टिज या इमारतीच्या पार्कींगमध्ये पार्क केली होती. त्यानंतर रात्री नऊ ते साडेअकराच्या दरम्यान ही चोरी झाली आहे.
याप्रकरणी फिर्यादी शैलेश हरिभाऊ बिरदवडे (वय ३९. रा. राणुबाई मळा, सहारा ऑर्चिड चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी शैलेश बिरदवडे यांची काळ्या रंगाची हिरो हॉंडा कंपनीची स्प्लेंडर भुजबळ अळीतील साई प्रेस्टीजच्या पार्किंगमध्ये लावली होती. रात्री नऊ ते साडेअकराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जवळपास २० हजार रुपये किंमतीची ही गाडी चोरली असावी.
याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार निघोटे हे तपास करत आहेत.