असंख्य श्रोत्यांना मुग्ध करणारा आवाज थांबला – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे
by
sahyadrilive
June 8, 2022 12:09 PM
मुंबई : आपल्या भारदस्त आवाज आणि खास शैलीने असंख्य श्रोत्यांना मुग्ध करणारा आवाज आज थांबला, अशा शब्दांत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अनेक शासकीय व खाजगी समारंभात आपल्या बहारदार निवेदन शैलीतून प्रसन्न वातावरण निर्मिती करण्याचे प्रदीप भिडे यांचे तंत्र, शब्दभांडार व शब्दफेक अनेकदा प्रत्यक्षपणे अनुभवल्याच्या आठवणींना राज्यमंत्री तटकरे यांनी उजाळा दिला.
मुंबई दूरदर्शनचे वृत्त निवेदक अशी मुख्य ओळख असलेल्या परंतु आपल्या आवाजाने असंख्य सोहळे यादगार करणारे प्रदीपजी भिडे कायम स्मरणात राहतील, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.