किवळे गावच्या ग्रामस्थांची अशीही शाबासकी; शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची काढली मिरवणूक
शाळेतील ५ मुली आणि ३ मुले शिष्यवृत्ती स्पर्धेत झळकले
किवळे । सह्याद्री लाइव्ह । शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ (पाचवी) मध्ये किवळे गावातील ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये ५ मुली आणि ३ मुले आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षिका शांता बाजीराव राळे यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
या परिक्षेत ३०० पैकी २३० पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती स्पर्धेत किवळे गावातील शाळेच्या एकूण 34 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात एकूण ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात ५ मुली आणि ३ मुले आहेत.
विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
किवळे गावात विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली म्हणून किवळे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, सर्व पालक वर्ग यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली.
विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शकांचाही सन्मान
विद्यार्थ्यांसोबतच ह्या ऐतिहासिक कामगिरीसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी अशा सर्वांचा किवळे ग्रामस्थांचा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी कोकणे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शेवकरी यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. तदनंतर किवळे शाळेच्या कार्यक्षम मुख्याध्यापिका मंगल कानडे यांचा निरोप समारंभ जड अंतःकरणाने मोठ्या थाटामाटात करण्यात आला.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES