खेड तालुक्यातील रेटवडी-पिंपळगाव गटात शिंदे गटाचं बळ वाढलं
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
खेड। सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला.
या सर्वांचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या. या भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन समिती यासह विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून गावागावात भरघोस निधी आणणार असल्याची ग्वाही दिली. खेड तालुक्याच्या विविध भागातील अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत येण्यास इच्छुक असून रविवारी होणाऱ्या जनता दरबारामध्ये या सर्वांचे सहर्ष स्वागत व सत्कार करणार असल्याचे यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे खेड व भोसरी मतदार संघाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व शिवसेना खेड तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमावेळी रेटवडी – पिंपळगाव जिल्हा परीषद गटातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला. यामध्ये युवासेना जिल्हा समन्वयक धनंजय पठारे, उपतालुका प्रमुख विशाल पोतले, चिंचबाई वाडी सरपंच संतोष गार्डी, अंबर सावंत, गाडकवाडी सरपंच वैभव गावडे, उपसरपंच विशाल गावडे, शेलपिंपळगाव उपसरपंच लिलाबाई दौंडकर, साबळेवाडी माजी सरपंच रेखा साबळे, दावडी माजी सरपंच संगीता दोरे, सदस्य संतोष सातपुते, माजी सरपंच बहुळ समाधान पानसरे, वाहतुक सेना उपतालुका प्रमुख अमोल इंगळे, शेतकरी सेना विभागप्रमुख रोहीदास दौंडकर, विविध कार्यकारी सोसायटी चिंचोशी संचालक दत्ता दरमुडे, युवासेना विभागप्रमुख मारूती मसाडे, युवासेना उपविभागप्रमुख सोमनाथ घाऊते आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी जुन्नरचे माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, भगवान पोखरकर, उल्हास तुपे, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, भानुविलास गाढवे, अनिल काशिद, श्यामराव माने, तालुकाप्रमुख अरूण गिरे, राजेश जवळेकर, रामभाऊ सासवडे, विपुल शितोळे, शिवसेनेचे पुणे जिल्हा परीषद गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शहरप्रमुख, शहर संघटक व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.