अखंड भारताचे सार्वभौमत्व देशाच्या संविधानात; राजगुरुनगरमध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
खेड । सह्याद्री लाइव्ह । “अखंड भारताचे सार्वभौमत्व देशाच्या घटनेत असते. आदर्श राजनितीची शिकवण घटनेतील तरतुदींतून जगापुढे आदर्श देश म्हणून मान्यता मिळवते”, असे प्रतिपादन राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी केले.
राजगुरुनगर येथील वाचनालयात संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संविधान उद्देशिका प्रतिमेस विलास सुतार व प्रवीण पारेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्वांच्या वतीने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संसदेने घटना समितीकडून घटना २६ नोव्हेंबर १९५० रोजी मान्य करून स्वीकारली, याची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो, असे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गानू यांनी केले.
यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गानू, मेघना दीक्षित, अजय बलदोटा, विठ्ठल जाधव, राजेंद राशिनकर, कल्पना वाव्हळ, लीना कुलकर्णी, पल्लवी जाधव, सुदाम देखणे, विठ्ठल जाधव यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.