पुष्पा २ चे शुटींग सुरू
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । ‘झुकेगा नही’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत ‘पुष्पा’ने तब्बल साडेतिनशे कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या सिक्वलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमातील श्रिवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंधनाने नुकतीच सिनेमाच्या शुटींगचा एक फोटो Tweeter वर पोस्ट केला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सध्या पुष्पा चर्चेत आहे.
‘पुष्पा द रूल’ २०२३ च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता आहे. Mythri Movie Maker ने आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवर सिनेमाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत चित्रपटाच्या शुटींगची लगबग पहायला मिळते.
या चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेले अल्लु अर्जुन आणि रश्मिका मांधनाचे चाहते देशभर आहेत. या चित्रपटात सेतुपती खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे.
सध्या साउथचे चित्रपट जोरावर आहेत. बॉलिवुडला मागे टाकत करोडोंचा गल्ला करणारे सिनेमे साउथच्या चित्रपटसृष्टीने दिले आहेत. दमदार कहानी आणि जोरदार गाण्यांमुळे ‘पुष्पा द राईज’ सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामूळे त्याचा येणारा सिक्वल ‘पुष्पा द रूल’ रिलिजपुर्वीच चर्चेत आहे.