शिवरायांच्या मावळ्यांची सातासमुद्रापार ‘गर्जना’; शिवजयंतीनिमित्त दुबईमध्ये रंगला विचारांचा मेळा
संयुक्त अरब अमिरातीमधील शिवप्रेमींना घरपोच ग्रंथभेट
दुबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई यांच्या वतीने सलग आठ वर्षे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती ऑनलाईन व लिमिटेड शिवभक्तांमध्ये साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी शिवजयंतीसाठी इतिहास संशोधक, लेखक, शिवव्याख्याते यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे यंदा प्रसिद्ध प्रमुख व्याख्याते प्रवीण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्यातून परदेशी व्यवसाय संधी व रोजगार व कस शिकायला हवे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रतिपादन करून ऑनलाइन व निवडक नागरिकांच्या उपस्थितांची मने जिंकली.
या शिवजयंतीनिमित्त आयोजकांनी शिवराय आणि त्यांच्या इतिहासाच्या निगडित व्हिडिओ स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धकांमध्ये भारतातून, संयुक्त अरब अमिरातीतून आणि इतर देशातून उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आली. यावर्षी आयोजकानी संयुक्त अरब अमिरातीमधील शिवप्रेमींना घरपोच ग्रंथभेट देण्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत देशमुख व मुकंदराज पाटील यांनी केले. विक्रम भोसले यांनी सत्यशोधक प्रवास आणि महापुरुषांची ओळख करून दिली व जितू सपकाळे यांनी आभार मानले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख रामेशवर कोहकडे यांनी करून केली. ऑनलाईन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाजू आशिष जीवने, शिवरायची गारद, विजयसिंह शिंदे यांनी सांभाळली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साईनाथ मांजरे, अमोल कोचळे, निखिल गणूचे, अभिजीत देसाई, जयंत रंगारी, पंकज आवटे, संदीप कड, सुनंदा सपकाळे, अभिजितसिंह सावंत व टीम भारतातून व तसेच आजू चोरघे, अनिल थोपटे, संतोष सकपाळे व संतोष होले, धुमाल, अमोल पाटील आदी मावळ्यांनी अथक परिश्रम घेतले.