ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीची समस्या; पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर माठे आव्हान
लंडन । सह्याद्री लाइव्ह । ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी नुकताच नवीन अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात करांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली गेली आहे. यामध्ये ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स २५ टक्क्यांवरुन ३५ टक्के करण्यात आला आहे तर इलेक्ट्रिक जनरेटरवर ३५ टक्के तात्पुरता कर लावण्यात आलेला आहे. आर्थिक मंदीमुळे देशवासीयांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अर्थसंकटामुळेच राजीनामा दिला होता. ऋषी सुनक यांनी देशाला या संकटातून बाहेर काढण्याचा दावा करत पंतप्रधानपदाचा भार स्विकारला होता. त्यामूळे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे इंधन आणि इतर वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्याचाही परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ब्रिटनमध्ये महागाईचा दर ११.१ टक्क्यांवर गेला होता.