पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले
महिलेची बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद : पाच जणांना अटक, न्यायालयीन कोठडी
बारामती – पती लैंगिक दुर्बल असल्याने त्याने पत्नीशी जबरदस्तीने सात ते आठ जणांना शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक केली असून त्यांना बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
हा गुन्हा (दि.9) डिसेंबर रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, त्याची जाहीर वाच्यता केली जात नव्हती. या संदर्भातील बारामती शेजारच्या एका गावातील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीला लैंगिकदृष्ट्या कमजोरी असल्यामुळे त्याने त्याच्या लैंगिक भावना उत्तेजित करण्यासाठी काही मित्रांना घरी आणून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यासंदर्भात पीडितेच्या मोबाइलवरून संबंधित मित्रांना मेसेज करून बोलवले जायचे. पीडितेने वेळोवेळी विरोध केल्यानंतर तिच्या पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. इतरांना कोणाला सांगू नये यासाठी तो सतत तिच्याबरोबर असायचा.
हा प्रकार 2017 ते 2021 च्या जुलै महिन्यापर्यंत सुरू होता. अखेर त्रास सहन न झाल्याने पीडित महिला तिच्या माहेरी निघून आली. तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यावरून पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिच्या पतीसह राहुल प्रमोद गावडे, अरबाज आझीम इनामदार, फैजल दिलावर इनामदार, गणेश ईश्वर अवघडे ऊर्फ पिंपरीकर व इतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील पतीला व राहूल गावडे यास पोलिसांनी नऊ डिसेंबर रोजी अटक केली असून, अरबाज इनामदार व फैजल इनामदार, गणेश पिंपरीकर या तिघांना (दि.11) रोजी अटक केली. न्यायालयाने दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात या पाच जणांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मुख्य संयोजक स्वामीराज भिसे आणि प्रविण शिंदे यांनी केलं आहे.