चाकणमध्ये 9 जानेवारीला वधू-वर मेळावा
by
sahyadrilive
December 22, 2021 11:07 AM
चाकण : येथे संत सावतामाळी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा येत्या 9 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती उद्योजक राजेंद्र घुमटकर यांनी दिली. सप्तपदी वधू-वर सूचक मंडळ पुणे यांच्या सहकार्यातून चाकण येथे वरील नियोजित दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील भाग्य लक्ष्मी मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.