रोटरी क्लबतर्फे खेड तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा शिक्षकदिन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरच्या वतीने शिक्षकांच्या कार्याला सन्मानित करण्यात आले. खेड पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ३५ केंद्रातील एकूण ७५ शिक्षकांचा त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी केलेल्या अनमोल आणि उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांना राजा शिवछत्रपती सभागृहात एक झाड आणि मानचिन्ह माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील, रोटरीच्या अध्यक्षा जयश्री संतोष पडवळ आणि सीमा रवींद्र मलघे यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण मांजरे, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, प्रसन्न महिला गृह उद्योग समूहाच्या संचालिका विजया अशोक शिंदे, रोटरीचे सहायक प्रांतपाल इक्बाल शेख आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी हॉटेल न्यू महादेव भाम, पर्यावरण जागर प्रतिष्ठान आणि चौधरी कार्पेट एजन्सी यांचे सहकार्य लाभले.
शिक्षकांच्या वतीने वर्षाराणी वाटेकर आणि बाबाजी शिंदे आणि मनोगत व्यक्त केले. त्यांच्या झालेल्या सत्कार बद्दल रोटरी क्लब आणि सहयोगी संस्थांचे आभार मानले आणि खूप जास्त आणि धडाडीने मेहनत करून हुशार विद्यार्थी घडविण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अविनाश कहाणे, मंगेश हांडे, अजित वाळुंज, विठ्ठल सांडभोर, सुधीर मांदळे, संतोष पडवळ, चक्रधर खळदकर, प्रशांत कर्नावट, नरेश हेडा, राहुल वाळुंज, डॉ. आशिष गुजराथी, सतिश नाईकरे पाटील आदींनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गुजराती यांनी तर प्रस्ताविक दत्ता रुके यांनी केले. सचिव अर्चना ज्ञानेश्वर करंडे यांनी आभार मानले.