खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षकांना सन्मानित करुन शिक्षक दिन साजरा
खेड । सह्याद्री लाइव्ह । भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवसाचे औचित्य साधून सोमवार ५ सप्टेंबर २०२२ रोजी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसच्या वतीने खेड तालुक्यातील कला वाणिज्य महाविद्यालय पाईट, कुंडेश्वर विद्यालय पाईट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईट, एलाईट स्कूल पाईट अशा शाळा व कॉलेज मध्ये शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य शेख सर, मुख्याध्यापक कुमकर सर, केंद्रप्रमुख येवला सर, बाणखेले सर,युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, युवती अध्यक्षा आशा तांबे, सरपंच मंगल भांगे, उपाध्यक्ष निलेश मांजरे, उपसरपंच गुलाबराव खेंगले, सोमनाथ डांगले, उपाध्यक्षा सुनिता आहेरकर, राजश्री ढोरे, मनिषा ठाकूर, रुपाली गारगोटे, अर्चना शिंदे, कविता सहाणे, प्रज्ञा सहाणे, आदी उपसथित होते.