साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । येथील साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचा वृक्ष देऊन सन्मान केला व निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर शिक्षकांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यसाठी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली.
विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना उत्स्फूर्तपणे भावना मांडल्या. प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी मार्गदर्शन व्यक्त केले. हर्षल काळे, दिशा मठकर, साहिल येवले, प्रतिक सपाट, प्रणिता माने, निकिता वाघिरे, रोहन काशिद, तन्वी यादव, साक्षी घोडके, समीर बारणे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. साईनाथ पाचारणे, प्रा. डॉ. एस. एम. जगताप, प्रा. डॉ. उमेश भोकसे, प्रा. ए. जे. बेंडाले, प्रा. टी. बी. वेहळे, प्रा. एम. पी. कोल्हे, प्रा. ए. ए. इंदायीस, प्रा. के. डी. गोकुळे, प्रा. धनवर्षा बोऱ्हाडे, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. शिवम कदम, प्रा. प्राजक्ता गदादे, प्रा. अलफिया इनामदार, प्रा. ललिता काठे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल शिंदे, साक्षी शेलार, अभिषेक मलघे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रा. शिवम कदम यांनी मानले.