आमदार किशोर पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी; खेड तालुका पत्रकार संघाची मागणी
खेड उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार महाजन यांच्यावर हल्ला, अर्वाच्य शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खेड तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे. या बद्दल खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि तहसिलदार प्रशांत बेडसे यांना सोमवारी (दि. १४) निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे, संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुनील थिगळे, नाझीम इनामदार, संजय शेटे, महेंद्र शिंदे, रोहिदास गाडगे उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर काही दिवसांपुर्वी हल्ला झाला होता. आपल्या लिखाणातून मुख्यमत्र्यांवर टिका केल्याबद्दल पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना अर्वाच्य शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सारं संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी खेड तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.