गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड
गुलाल, भंडा-याची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष
गारगोटवाडी (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । गारगोटवाडी गावची उपसंरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. माजी उपसरपंच सतिश भगवंता गारगोटे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली होती. उपसरंपंच पदाच्या या निवडणूकीत सविता बाळासाहेब शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रतिभा डोंगरे या उपस्थित होत्या. सविता शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थंकानी जल्लोष साजरा केला. गुलाल, भंडां-याची उघळण करण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गावांमध्ये नवनिर्वाचि उपसरपंचांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी उपसरपंच सविता शिंदे यांचा सत्कार करताना आदर्श द्वितिय लोकनियुक्त सरपंच वर्षा मनोहर बच्चे, माजी उपसरपंच सतिश भगवंता गारगोटे, सदस्य सोनाली हनुमंत गारगोटे, रोहिणी कल्पेश गारगोटे, लता काळोखे, आपला माणुस जनतेचा सेवक मानवाधिकार मिडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि गारगोटवाडी ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ विष्णू कंद पाटील, निवडणूक अधिकारी ग्रामसेवक प्रतिभा डोंगरे तसेच गारगोटवाडी, कंदवाडी, कारामळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.