कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील प्रदुषणावर तत्काळ उपाययोजना करा – मंत्री सुनील केदार
बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2022-23 साठी जिल्ह्याची 257.22 कोटी रूपयांची वित्तीय मर्यादा आहे. या वित्तीय मर्यादेच्या आराखड्यात 57.78 कोटी रूपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील आर्थिक वर्षाचा आराखडा वाढीव तरतूदीसह 315 कोटी रूपयांचा झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2022-23 राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन आज 24 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग कक्षात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेल्या सि.राजा व लोणार पर्यटन विकास आराखड्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच लोणार व सिं.राजा पर्यटन विकासासाठी स्वतंत्र निधी मिळणार असल्यामुळे आराखडाही गतीने पुढे जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेकरीता वाढीव तरतूदीसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.