महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
by
sahyadrilive
November 29, 2022 10:38 AM
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोन्हीही राज्ये नेहमीच सीमेवरील अनेक गावांवर आपला दावा करत आहेत. सांगलीतल्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकमधील मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. यानंतर दोन्ही राज्यांतील राजकिय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापलेले आहे.
दरम्य़ान, या प्रकरणावरील प्रलंबित सुनावणी ३० नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज दिल्लीत दाखल होणार आहेत.