रविवार, सोमवारी डेक्कन क्वीन, एक्स्प्रेस रद्द
पुणे : कळवा आणि दिवा स्थानकादरम्यान धिम्या कॉरिडॉरवर पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 2 जानेवारी रोजी रात्री 2 वाजल्यापासून ते 3 जानेवारी रात्री 2 वाजेपर्यंत अॅप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
मध्य रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रुळांना जोडण्यासाठी विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 जानेवारी रोजी सुटणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, 2 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, 3 जानेवारी रोजी सुटणाऱ्या आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस रद्द होणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या मार्गात अंशत: बदल
1 जानेवारी रोजी सुटणारी हुबली-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-कोयना एक्स्प्रेस पुणे स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. 2 जानेवारी रोजी सुटणारी दादर-हुबली एक्स्प्रेस दादरऐवजी पुणे स्थानकातून आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे स्थानकातून सुटणार आहे.