व्यावसायिकाच्या मुलाची आत्महत्या
औंध रस्ता भागातील प्रकार
पुणे : औंध रस्ता परिसरात एका व्यावसायिकाच्या मुलाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. व्यावसायिकाच्या मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलन सॅन्डी मेहता (वय 27, रा. कॅसल रॉयल सोसायटी, औंध रस्ता) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
मिलन याचे वडील शेअर दलाल आहेत. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मिलन याने अकराव्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारली, त्याचा जागीच मृत्यू झ्ाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही वर्षांपासून मिलनने नैराश्यात होता,
त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचारही सुरू होते. “आय एम सॉरी’, असे मिलन याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तांबे तपास करीत आहेत.