नाशिकरोड स्थानकावर तब्बल दोन तासांनंतर आग विझवण्यात यश
by
sahyadrilive
November 5, 2022 3:48 PM
नाशिक । सह्याद्री लाइव्ह । नाशिकरोड रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सकाळी नऊच्या सुमारास आलेल्या शालीमार एलटीटी या शालीमार एक्सप्रेसच्या मागच्या डब्याला आग लागली होती. या आगीत बोगीतील कपड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही. तत्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
तब्बल दोन तासांनी अग्निशमन दलाच्या आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश आले. परंतू तोपर्यंत गोदावरी एक्सप्रेस शिर्डी दादर बनारस एलटीटी या रेल्वे गाड्या ओढा कसबे सुकेन या ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.