शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये होलेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
दोन विद्यार्थीनींचे राज्यस्तरीय यश; सात विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्र शिक्षण परिषदेने घेतलेल्या सन २०२३ च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) होलेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थीनी राज्यस्तरावर चमकल्या आहेत. तर सात विद्यार्थी जिल्हास्तरावर शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वैष्णवी मांजरे (२८० गुण) हिने राज्यात सहावा तर ज्ञानेश्वरी पानमंद (२७२ गुण) हिने राज्यात दहावा क्रमांक पटकावला.
याशिवाय अविष्कार जाधव (२५६ गुण), श्रावणी होले (२५६ गुण), वैभवी मांजरे (२४८ गुण), संस्कृती होले (२४४ गुण), आराध्या मांजरे (२४२ गुण), सिद्धार्थ मांजरे (२४० गुण), वैष्णवी होले (२३२ गुण) हे सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका पुष्पांजली महादू राळे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संदीप काळे, शिक्षिका रोहिणी लांघी, नूतन कडलग, संगीता दिघे, अशोक कडलग, मंजूषा गाढवे यांनी सहकार्य केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, केंद्रप्रमुख दत्तात्रय गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES