राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणी
by
sahyadrilive
September 16, 2022 4:13 PM
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी होणार आहे.
या सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहांमध्ये तेलंगी ऐवजी तेलगी तसेच अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार व हलवाई अशा जाती समूहांची सुनावणी होणार आहे, असे संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.