दिनविशेष : जागतिक ओझोन दिवस
१६।०९।१९९४
by
sahyadrilive
September 16, 2022 12:42 PM
सह्याद्री लाइव्ह। सध्या २०२१ मध्ये पृथ्वीचे वातावरण खुप तप्त होत चाललेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलते हवामान या सारख्या गोष्टींचा आपल्या पर्यावरणावर खुप मोठा परिणाम होत आहे, आणि याचा परिणाम थेट पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन ह्या थरावरती होत आहे. शास्रज्ञांच्या मते ओझोन थर विरळ झाल्याने पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
सुर्याची अतिनील किरणे मानवाच्या त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला कर्करोग होण्याचा धोका असतो. तसेच वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरील बर्फ वितळुन पूर येण्याची शक्यता आहे. व या पुरामूळे काही शहरे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत.
या सर्व गोष्टींचे गांभिर्य लक्षात घेऊन दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणुन साजरा केला जातो.