दिनविशेष : जागतिक हिंदी दिवस
१४ सप्टेंबर १९४९
by
sahyadrilive
September 15, 2022 1:19 PM
सह्याद्री लाइव्ह। आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे. आपल्या देशात २९ राज्य व ७ केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्या भारतात ४४ भाषा बोलल्या जातात. त्यात हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. जेव्हा भारताला इंग्रजांकडुन स्वातंत्र मिळाले तेव्हा भारतिय संसदेमध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणुन दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली गेली. त्या नंतर १४ सप्टेंबर १९४९ ला हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला.
आज हिंदी भाषा जगामध्ये ४थ्या क्रमांकाची भाषा आहे. जी सर्वात जास्त बोलली जाते. पहिल्या क्रमांकावर चिनी भाषा म्हणजेच Mandarin बोलली जाते. त्या नंतर दुस-या क्रमांकावर स्पॅनिश ही भाषा आहे. तर तिस-या क्रमांकावर इंग्लिश ही भाषा आहे.