दिनविशेष : कथालेखक, नाटककार,नाटक अभ्यासक राजीव नाईक यांचा जन्म १९५६
१२।०९।१९५६
by
sahyadrilive
September 12, 2022 12:08 PM
सह्याद्री लाइव्ह। राजीव बापुराव नाईक यांचा जन्म बडोदा येथे झाला. वेगळ्या शैलीच्या वैशिष्ट्यपुर्ण कथा लिहिणा-या नाईकांनी काही प्रायोगिक नाटकेही लिहिली आहेत. अनाहत, वांधा, सांधा, अखेरचं पर्व, आपसातल्या गोष्टी, साठेचं काय करायचं, ही त्यांची नाटके होत.
तसेच नाटकांकडे अधुनिक दृ्ष्टीने पाहणारी काही वैशिष्ट्यपुर्ण पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. निवडक कथांचा मोकळा हा कथासंग्रह प्रकाशित. साप्ताहिक दिनांक मधुन १९७८ ते १९८० या काळात नाट्यपरिक्षण हे सादर त्यांनी चालवले.