दिनविशेष : पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील छत्रपती शिवाजी पुलाचे उद्घाटन
१७।०९।१९२३
by
sahyadrilive
September 17, 2022 12:24 PM
सह्याद्री लाइव्ह।छत्रपती शिवाजी पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते करण्यात आले. १९२० मध्ये जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुण्यातील त्या काळातील प्रख्यात ठेकेदार गणपतराव महादेव केंजळे यांनी या पुलाचे काम केले.
१९२० पुर्वी लाकडी पुल व कसब्यातील धरणवजा पुल ही दोनचं माध्यमे नदी ओलांडण्यासाठी १२ महीने वापरण्यासाठी उपलब्ध होती. या पुलास लॉर्ड पुल असेही म्हटले जाते. या पुलाच्या मध्यभागी महिरप व एकुण आठ कमानी आहेत. मधील महिरपीप्रमाणे अजुन एक महिरप शेखसल्ला दर्ग्यापाशी असुन, ती बुजवली आहे. संपुर्ण दगडी बांधकाम असलेला हा पुल आजही सुस्थितीत आहे.