खेड तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग; थोड्याशा पावसानंतर सोयाबीन पेरण्या उरकल्या
शेतकरी अजुनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यात शेतक-यांची पेरण्या करण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणूकीनंतर लग्न समारंभांमध्ये मश्गुल झालेले शेतकरी आता पुन्हा शेताकडे वळले आहेत. तालुक्यात पेरण्यांच्या पुर्वतयारीला जोर आला आहे. आता शेतकरी आभाळाकडे नजर लावून दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
थोडाफार झालेल्या पावसानंतरच्या थोड्याशा ओलिवर शेतक-यांनी सोयाबीन पेरण्या उरकल्या आहेत. आता खरीपाच्या पीकांच्या पेरण्यांसाठी शेतक-यांची लगबग सुरू झाली आहे.
पेरणीपुर्वीची नांगरणी, फणणी, वखणणी आणि खते टाकणे यांसारखी कामे उरकली आहेत. पावसाला सुरूवात जरी झाली असली तरी अजुन अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टला प्राधान्य दिले जात असल्यामुळे ट्रॅक्टरने शेतकामे करणा-या व्यवसायिकांच्या धंद्यात वाढ झाली आहे.
खेड तालुक्यात एकूण ४० हजार हेक्टर खरीप क्षेत्र असून त्यापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भाताचे पीक घेतले जाते. ८ टक्के जमिनीवर बटाटा आणि इतर पीके घेतली जातात.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES